
मालवण : आडारी रोड येथील सातेरी मांड परिसरात कुक्कुट पालन करणारे चंद्रकांत पांडुरंग जैतापकर यांच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी ३० कोंबड्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. ही चोरी शनिवार रात्री ८ वाजल्यापासून रविवार सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली असून, चोरट्यांनी शेडमधील लाईटची वायर तोडून विद्युत व्यवस्थेचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे जैतापकर यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार अधिक तपास करीत आहेत.










