शिवसेनेकडून ममता वराडकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर

आमदार निलेश राणे यांनी पक्षाचा एबी फॉर्म केला सुपूर्द
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 15, 2025 13:52 PM
views 323  views

मालवण : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका ममता वराडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांनी त्यांना शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, प्रभाग तीन मधून शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांना नगरसेवक पदासाठी एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक नऊ मधून महेश कोयंडे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. शिवसेना पक्षाकडून सर्व नगरसेवक उमेदवारांना एबी फॉर्म वितरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दरम्यान रविवार 16 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षाचे उमेदवार सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.