मालवणात दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज नाही

Edited by:
Published on: November 11, 2025 17:48 PM
views 77  views

मालवण : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काल पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काल पहिल्या दिवशी आणि आज दुसऱ्या दिवशीही नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसत होती. 

काल पासून १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर २०२५ असून २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.