
मालवण : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पदाचे आरक्षण सिंधुदुर्गनगरी येथे पार पडले. या आरक्षणात ६ जिल्हा परिषद मतदार संघांपैकी ५ मतदार संघात महिलाराज असणार आहे. तर एकच पेंडुरं मतदार संघात खुले आरक्षण पडले आहे. जिल्हा परिषद मतदार संघनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे.
सुकळवाड जिल्हा परिषद : अनुसूचित जाती महिला
आचरा, आडवली-मालडी, मसुरे, वायरी-भुतनाथ जिल्हा परिषद मतदार संघ : सर्वसाधारण (खुले) महिला
पेंडूर जिल्हा परिषद : सर्वसाधारण (खुले)










