
मालवण : मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिलासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. नगराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे शहरात फिरत होते. काहींनी चतुर्थीतही गणेश दर्शन करत शहरात जोरदार फिल्डिंग लावली होती. पक्षाच्या कार्यक्रमापासून, समाजिक उपक्रम ते इतरांच्याही कार्यक्रमात पुढे दिसत होते. मात्र, ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने या सर्वांचा हिरमोड झाला आहे. अनेकांची दांडी गुल झाल्याने शहरात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
आता महिला ओबीसी पडल्याने अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. ज्या चर्चेतच नव्हत्या 'त्या' आता चर्चेत आल्या आहेत. यात कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता लागून आहे. काहींनी फोनाफोनी सुद्धा केली असून अनेकांना शुभेंच्छांचे फोन सुरु झाले आहेत. थेट जनतेतून पहिल्या नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.










