
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनतेतून पहिल्या टप्प्यात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे. मालवण कुडाळ मतदार संघात आता पहिल्या टप्प्यात २४ कोटी निधी मंजुरी बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त करताना खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आगामी काळातही मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नाशील असणारे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा अंतर्गत ४ कोटी ६८ लक्ष, नागरी सुविधा अंतर्गत १ कोटी ५० लक्ष, ग्रामीण मार्गसाठी २ कोटी ५० लक्ष, क वर्ग यात्रास्थळ विकास साठी १ कोटी, इतर जिल्हा मार्गसाठी १ कोटी ५० लक्ष, नवीन ट्रान्सफार्मर व स्ट्रीट लाईट साठी २ कोटी, शाळा इमारती साठी १ कोटी ६० लक्ष, लहान मासेमारी बंदरांचा विकास १ कोटी ७७ लक्ष असा सुमारे २४ कोटी निधी वरील विविध हेड खाली पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.
गेल्या दहा महिन्यात आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात शेकडो कोटी निधी मंजूर करून आणला. देवबाग किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने एकाचवेळी 158 कोटी निधी मंजूर करून घेत आमदार निलेश राणे यांच्या कामाची धमक दिसून आली. यापुढील काळतही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे अधिकाधिक विकासनिधी मंजूर करून आणतील. त्यांचे व्हिजन असलेला आदर्श मतदार संघ बनवतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.










