चिंदर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा रंगोत्सव सेलिब्रेशनमध्ये सहभाग

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 28, 2025 10:59 AM
views 151  views

मालवण : शालेय अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर ही परीक्षाना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आपल्या जि. प. प्रा. शा. चिंदर सडेवाडी प्रशालेमधील विद्यार्थांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन साठी भाग घेतला होता. यामध्ये  कलर कॉम्पिटिशन, कोलाज मेकिंग, फिंगर पेंटिंग या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यामध्ये मयुरी किरण कांबळी (4 थी) कोलाज मेकिंग गोल्ड मेडल, फिंगर पेंटिंग सिल्वर मेडल. संजना संदीप राठोड (3 री) - कलर कॉम्पिटिशन गोल्ड मेडल, कोलाज मेकिंग ब्रॉन्झ मेडल, माही मंगेश गोसावी( 2 री) फिंगर पेंटिंग गोल्ड मेडल, स्वानंद सचिन घागरे (2 री) कलर कॉम्पिटिशन गोल्ड मेडल, दिशांत प्रशांत कांबळी (3 री) फिंगर पेंटिंग गोल्ड मेडल, कोलाज मेकिंग सिल्वर मेडल, समर्थ सुधीर सुर्वे (2 री) कलर कॉम्पिटिशन सिल्वर मेडल, देवांग धाकूनाथ गोसावी (4 थी) कलर कॉम्पिटिशन ब्रॉन्झ मेडल, दिव्यांका अमित कानविंदे (2 री) फिंगर पेंटिंग आकर्षण बक्षीस मिळाले. तसेच सर्व सहभागी विदयार्थ्याना नॅशनल लेवलचे सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.  

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुले विविध स्पर्धेत सहभागी व्हावीत. यातून सराव होईल आणि मुलांना अधिक शिकता येईल, मुले उद्याच्या स्पर्धेच्या युगासाठी तयार होतील असे मत मार्गदर्शक शिक्षिका प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत यांनी मांडले. शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड यांचेही मार्गदर्शन मुलांना लाभले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष  स्वाती सुर्वे, प्रीती कांबळी, धनश्री गोसावी मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, सुहासिनी गोसावी, संदीप राठोड, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.