SSC RESULT 2023 | मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५३ टक्के

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 02, 2023 19:51 PM
views 81  views

मालवण : मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९९.५३ टक्के एवढा लागला असून या परीक्षेसाठी प्रविष्ठ १०६५ विद्यार्थ्यांपैकी १०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ४९८ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी पटकावली असून प्रथम श्रेणीत ४०६ तर द्वितीय श्रेणीत १३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण ३५ शाळांपैकी ३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून तीन शाळांचा निकाल १०० टक्के पेक्षा कमी लागला आहे.

रोहिणी परुळेकर रोझरी इंग्लिश स्कुल हिने 98.20 तालुक्यात प्रथम क्रमांक, रोझरीच्याच समृद्धी धमापूरकर 97.60 हिचा आणि कट्टा हायस्कुलची सई ताम्हणकर 97.60 हिने द्वितीय तर वेदांत गोसावी याने 97.20 गुण घेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकवीला