मालवण पंचायत समितीवरही महिलाराज

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 07, 2025 16:50 PM
views 159  views

मालवण : मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष पदानंतर आता मालवण पंचायत समितीवरही महिलाराज आलं आहे. सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षित झालं आहे. त्यामुळे पंचायत समितीतही पुरुषांचा पत्ता कट झाला असून महिलांना कारभार करण्याची संधी मिळणार आहे. सदस्य पदाच्या आरक्षणा नंतर सभापती पदाचा चेहरा समोर येणार येणार आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे उद्या आरक्षण पडणार आहे.

मालवण पंचायत समिती सभापती पदाचे सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं आहे. सध्या पंचायत समितीवर प्रशासक कारभार करत आहेत. आरक्षण जाहीर होत झाल्याने निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सभापती आरक्षणानंतर सदस्य पदाचे आरक्षण पडणार आहे. मालवण तालुक्यात 12 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. सदस्यांमधूनच सभापती पदाची निवड होणार आहे. त्यामुळे तालुक्याचा कारभार व्यवस्थित हाताळणाऱ्या महिलांची राजकीय पक्षांना निवड करावी लागणार आहे. अनेक पुरुष तालुक्याचे नेतृत्व करण्यास इच्छुक होते. मात्र, महिला आरक्षण पडल्याने पुरुषांचा हिरमोड झाला आहे. 

उद्या नगरसेवकांचे आरक्षण : 

मालवण शहरात दहा प्रभाग असून 20 नगरसेवक असणार आहेत. आज नगरसेवक पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. नगरसेवक होण्यासाठी  अनेकजण इच्छुक आहे. सर्वच प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. युती आघाडीत कोणाला संधी मिळते, कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला प्रभाग बदलावे लागणार हे आजच्या आरक्षणात स्पष्ट होणार आहे.