
सावंतवाडी : मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेल्या अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात म्हणजेच कोसळण्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. अखंड महाराष्ट्राला काळीमा फासणारी व तमान हिंदुस्थानातील शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी ही घटना आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी संबंधित दोषी असलेल्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा एडवोकेट रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवक अध्यक्ष नईम मेमन, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तौसिफ आगा, चंद्रशेखर परब, प्रसाद परब, शिवराम सावंत, वैभव परब आदी उपस्थित होते.