मुसळधार पावसामुळे मालवणात पडझड

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 07, 2023 18:49 PM
views 173  views

मालवण : मुसळधार पावसामुळे मालवणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनची संरक्षक भिंत कोसळून 99 हजार 250 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर साळेल येथील सुनीता नामदेव जाधव यांच्या घरावर माड पडून 30 हजाराचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत मालवणात पावसाचा जोर कायम होता.