हडी जठारवाडीतील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 26, 2025 20:14 PM
views 122  views

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हडी जठारवाडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहे. त्यांनी विकासकामांचा झंजावात निर्माण केला आहे.  याचं विकासकार्यावर प्रेरित होऊन तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश करत असल्याचे भावेश सुर्वे व सहकारी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, राजेश शेडगे, राजेश गांवकर, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, महिला उपतालुका प्रमुख पुजा तोंडवळकर, राजा तोंडवळकर, छोटू ठाकुर, मनोज हडकर, बाबू परब, राजू बिडये, सुधीर वस्त, दादा नाईक यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

हडी जठारवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा युवासेना पदाधिकारी भावेश सुर्वे यासह उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रकाश सुर्वे, सोहम कवठकर, आर्यन सुर्वे, मयूर बागवे, दिगंबर कवटकर, सुनील तोंडवळकर, रवींद्र सुर्वे, मनीष सुर्वे, महादेव परब, प्रभाकर तोंडवळकर, पराग तोंडवळकर, मनीषा वायंगणकर संचिता तोंडवळकर, नीलम वांगणकर, प्रिया तोंडवळकर, श्रीकांत तोंडवळकर, सिद्धेश गावडे, दीप्ती कवटकर, सुभाष वेंगुर्लेकर, प्रणाली तोंडवळकर विलासिनी गावडे, श्रीकृष्ण गावडे, दिया सुर्वे, दीपक सुर्वे कविता गावडे यासह ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.