'ती' गाय मालकाच्या स्वाधीन

Edited by:
Published on: September 26, 2025 19:45 PM
views 259  views

मालवण : मालवण शहरात फिरत असलेल्या एका जखमी गायीला अखेर वैभववाडी येथील गाय वासरू गोशाळेतील गो सेवकांनी मालकाच्या स्वाधीन केले.  

मालवण शहरात एका गायीच्या पायाला दुखापत झाली होती. पायातून रक्त येत असल्याने त्यावर उपचाराची गरज होती. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी वैभववाडी येथील गोशाळेशी संपर्क साधला. तसेच गायीला गाडीतून वैभववाडीत पाठविण्याबाबत गाडीची व्यवस्था करण्याचे प्रयत्न केला. मात्र, वाहतूक करण्यास कोण तयार होत नव्हतं. गणेश चव्हाण आणि सहकारी गायीवर लक्ष ठेऊन होते. गाडीची व्यवस्था होत नसल्याने अखेर वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेतील गोसेवक प्रफुल पवार, निलय शेरे आणि सहकारी हे गाडी घेऊन मालवणला आले. तोपर्यंत गाय मालकाचा शोध लागला. अन् गाय मालक ओंकार डोईफोडे यांच्याशी संपर्क झाला. मालवण येथील व्यापारी श्री राजपूत आणि गाय वासरू गोशाळेचे गोसेवक यांनी जखमी अवस्थेतील गाय ही धनगरवाडी येथील गाय मालक ओंकार डोईफोडे यांच्या स्वाधीन केली.