
मालवण : बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्यावतीने साने गुरुजी संस्कार शिबीर रविवारी 17 मे ते 21 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलंय. सकाळी 7 ते संध्या. 6. 30 या वेळेत शिबीर होणार आहे. साथी बाबासाहेब नदाफ आणि सहकारी शिरोळ यांचं मार्गदर्शन असेल.
एरोबिक्स, योगा, कॅलेस्थिनिक्स, नृत्य, गाणी, गोष्टी, गटचर्चा, खेळ, पथनाट्य, लेझीम, झांज, दांडीया असे उपक्रमही होणार आहेत. 10 ते 20 या वयोगटातील व्यक्तींना प्रवेश असेल. महत्वाचं म्हणजे प्रथम येणाऱ्या 40 जणांना फक्त प्रवेश असेल. तसेच, 100 रुपये प्रवेश फी असेल. त्यामुळे या शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचं आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केलाय.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
सेवांगण : 9423946003
रुचिरा : 9423673432