
सावंतवाडी : बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या परिसरात मलबारी राखी धनेश हा पक्षी आढळून आला. त्याच ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडावर तो राहत असल्यामुळे अनेकांच्या दृष्टी पडत आहे. मलबार राखी धनेश या पक्षाला इंग्रजीमध्ये मलबार ग्रे हाॅर्नबील असे म्हटले जाते.
हा पक्षी पश्चिम घाट तथा कोकणामधील प्रदेशनिष्ठ पक्षी आहे. हा पक्षी वड, पिंपळ, भेडले माड अशा झाडांची फळे खातो. त्याच्या विष्ठेमधून बीया जंगलात पसरतो. त्यामुळे अनेक वड वर्गीय झाडे रूजतात. हा पक्षी कोकणातील अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे. तो लहान मुलांचा आवाज काढतो. सद्यस्थिती त्यांचा विणीचा हंगाम आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत राहतो अशी माहिती प्राणी अभ्यासक गणेश मर्गज यांनी दिली.