राजकारणात पैसा कमवण ही सावंतवाडीची संस्कृती नाही : मंत्री दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: October 20, 2023 15:58 PM
views 114  views

सावंतवाडी : आमदार म्हणून माझ्यासारखा एखादा मनुष्य आपला पारंपरिक व्यवसाय सोडून राजकारणात येईल, प्रत्येक वेळेला तस होईल अस नाही. सध्या राजकारण म्हणजे व्यवसाय झाला आहे. राजकारणातून पैसे कमवण अन् त्यातुन मोठं होणं हे तरूण युवकांना शिकवलं जात‌य. मात्र, ही आपली सावंतवाडीची संस्कृती नाही असं विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल. पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, पुढच्या सहा महिन्यात सावंतवाडी संस्थामधील प्रत्येक आठवण जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण आवश्यक आहे. पर्यटनाची चळवळ बनली पाहिजे. गावासाठी, पर्यटनासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा सरकार म्हणून आपण नेहमी सोबत राहीन. तर कोल्हापूरच्या दसऱ्याप्रमाणे सावंतवाडी संस्थानचा ओटवणेतील शाही दसरा जगभरात पोहचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. माझ जीवन हे लोकांसाठी समर्पित केल आहे. रेश्मी वस्त्र उतरवून खादी वस्त्र परिधान केली आहेत. पण, विकासा दरम्यान तुम्ही भांडत राहिलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पर्यटनाच्या माध्यमातून आपणाला विकास साध्य करायचा आहे. गोव्यासारखा पर्यटनात आपला जिल्हा पुढे आला पाहिजे यासाठी प्रत्येकाच योगदान महत्त्वाचे आहे. मागच्या सरकारने एकही बैठक कोकणासाठी घेतली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांदा ते बांदा योजना बंद होताना ती बंद करू नका असं सांगितलं नाही. योजना बंद होताना मुख्यमंत्री काही म्हणत नसतील तर उठाव करावा लागतो. त्यातूनच हे सरकार स्थापन झालं.

सिंधुरत्न योजनेतला एकही रूपया माझा घरात गेला नाही. तो सर्वसामान्य गरिब मच्छिमार, महिला, शेतकरी यांच्या घरात गेला. मला आमदार, मंत्री होऊन गाड्या घ्यायच्या नाहीत. वडिलांपासून दहा दहा गाड्या घरात आहेत. सिंधुरत्न योजना ही एकमेव अशी योजना आहे ज्याचा थेट फायदा होतो. जनतेने त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केल.