सरसकट आरक्षण द्या | दोडामार्ग शिवसेना - भाजप पदाधिकाऱ्यांच तहसीलदारांना निवेदन

Edited by: संदीप देसाई
Published on: November 02, 2023 18:31 PM
views 30  views

दोडामार्ग : राज्यातील मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आंतरवली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनला दोडामार्ग येथील शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देत  पाठींबा दर्शविला आहे. सरकारने आम्हा मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर गांभीर्याने लक्ष घालून सरसकट मराठा बांधवांना आरक्षण द्यावे अशीही मागणी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने उपोषणे होत आहेत. शिवाय मनोज जरांगे पाटील आंतरवली सराठी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावली असून सरकारने मराठा आरक्षण मुद्याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी करत लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबाही दिला आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, उपजिल्हाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, शहरप्रमुख योगेश महाले, महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, विभाप्रमुख रामदास मेस्त्री, यांसह तीलकांचन गवस, पांडुरंग लोंढे, प्रवीण गवस, गुरू देसाई, राधिका गडेकर, सविता नाईक, गुरुदास सावंत आदी उपस्थित होते.