
सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील धालोत्सव शुक्रवारी रात्री दहा वाजता म्हालटकरवाड्यातील सर्व महिला, पुरुष, बाल गोपाळ मंडळी यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला. धालोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी वाड्यातील सर्व महिलांनी देवघरा समोरील जागा स्वच्छ करून सडा सारवण केली रात्रौ १० वाजता सर्व मंडळी एकत्र देवघरात येऊन महादेव उत्सव मुर्तीकडे पाट, पडली, नारळ फुले ठेवून गाऱ्हाणे घालून सर्व वस्तू मांडावर नेतात व गाऱ्हाणे घालून पहिल्या दिवशीच्या धालोत्सवाची सुरवात महिलांनी लोकगीते म्हणून केली
सात दिवस रात्रौ सुरू असलेल्या धालोत्सवात महिलांची उत्सुकता आनंदाची असून सर्वाच्या चेहऱ्यावर चैतन्य आलेले दिसून येते धालोत्सवाची शेवटची रात्र गुरुवार दिनांक 30/01/25 असून त्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित रात्र जागविली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता वाड्यातील व गावातील सर्व भावीक धालोत्सवाच्या मांडावर येतात यावेळी नवस बोलणे, नवस फेडणे, देवींच्या ओटी भरणे, आदी कार्यक्रम होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन म्हालटकरवाडा वासीयांनी केले आहे.