
सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील धालोत्सव सोमवार 1 जानेवारी रोजी सुरू झाला असून सात दिवस रात्र सुरू असलेल्या धालोसवाची बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी शेवटची रात्र आहे या रात्री महिला वर्ग विविध कार्यक्रमानी संपूर्ण रात्र जागवतात.
आठव्या दिवशी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून सर्व महिला मांडावर येवून कार्यक्रमास सुरुवात करतात यावेळी गावातील, पाहुणे, पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित असतात त्यानंतर देवींच्या ओट्या भरणे, नवस फेडणे ,मांड शिंपणे आदी कार्यक्रम असून धालोसवाची दुपारी सांगता होते. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हालटकरवाड्यातर्फे करण्यात आले आहे










