
मंडणगड : मैत्री फाऊंडेशन यांच्यावतीने शिवजयंत्तीचे चे औचीत्यसाधून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील गरजू व गरीब कुटुंबातील करत्या मंडळींना सुरक्षा कवच देण्याचे उद्देशाने संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या विमा सुरक्षा कवच पॉलीसींचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्यावतीने तालुक्यातील चाळीस लाभार्थीना या पॉलीसीचा लाभ देण्यात आला. या पॉलीसीमुळे लाभार्थी ऐंशी टक्के अपघात विमा व विस टक्के वैद्यकीय सुविधेचा लाभ प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, बाळकृष्ण मर्चंडे, विश्वदास लोखंडे, सखाराम मर्चंडे, उद्योजक शंकर जंगम, अरविंद येलवे, अनंत घाणेकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे राहुल खांबे यांची उपस्थित लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेश मर्चंडे यांनी भुषविले. कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत मनोज मर्चंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन माळी यांनी केले.
मैत्री फाऊंडशनचे अध्यक्ष मनोज मर्चंडे व उद्योजक शंकर जंगम यांनी शिवजंयत्ती निमित्त आयोजीत केलेल्या या समाजपयोगी उपक्रमाचे तालुक्यातून विशेष कौतूक केले जात आहे.