
सावंतवाडी : हिंदू रक्षक, हिंदुच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून देशद्रोह्यांच्या उरात धडकी भरणारे नेतृत्व कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्याने आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती येणार आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी व्यक्त केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षांत कणकवली,देवगड, वैभवशाली मतदारसंघात विकासाची गंगा आणली. पूर्ण मतदारसंघ भाजपमय केल्याने ते प्रचंड मताधिक्याने विजयी झालेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदू आशेने पाहत आहे. त्या सर्व हिंदूना आमदार नितेश राणे यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या निवडीमुळे अधिक ताकद मिळाली आहे. आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाला गती मिळेल अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली आहे.