शहरातील भटवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची महेंद्र सांगेलकर यांनी काँग्रेसतर्फे केली दुरुस्ती...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 11:20 AM
views 159  views

सावंतवाडी : खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी आणल्याची वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्याची दुरूस्ती करून एकप्रकारे चपराक दिली आहे. सावंतवाडी शहरातील विविध रस्त्यांना पडलेले खड्डे नगरपरिषद प्रशासनाने बुजवलेले नसल्यामुळे या खड्ड्या मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत सावंतवाडी शहरातील भटवाडी ते  कोलगाव निरूखेवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत हे मोठमोठे खड्डे पावसाचे पाणी भरल्यामुळे अधिकच धोकादायक बनले होते, मात्र सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वखर्चाने हे पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे.

या खड्ड्यामुळे वाहन चालवणे सोडा तर रस्त्यावरून चालणे ही पादचाऱ्यांना मुश्किल झाले होते पावसाचे पाणी भरल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांवर चिखलाचेपाणी उडत असत असे त्याचबरोबर खड्ड्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत होते मात्र सांगेलकर यांनी हे खड्डे जांभा दगड़ फोड़ूंन चालून खोल खड्डे बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे यावेळी बबन डिसोजा बबलू डिसोजा शरद गावडे आधी कार्यकर्तेही उपस्थित होते.

तर दुसरीकडे रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणल्याचे  सांगणाऱ्या राजकारणांनी किंवा न प प्रशासनाने या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या मुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.