वैभववाडी - कोकिसरे येथे आज महायुतीची सभा | केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन

Edited by:
Published on: April 08, 2024 04:20 AM
views 170  views

वैभववाडी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आज. (८ एप्रिल ) रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली.महायुतीने आज कोकीसरे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यात मंत्री नारायण राणे स्वतः हजर राहणार आहेत.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सुपर वारियर्स, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.