महावितरणचे कर्मचारी गणेश पाटेकर यांनी दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 06, 2022 21:11 PM
views 166  views

वैभववाडी : येथील महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ गणेश पाटेकर यांनी आपला वाढदिवस असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला. वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट स्वरूपात दिले. महावितरणच्या वैभववाडी कार्यालयात गणेश पाटेकर प्रधान तंत्रज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत.सोमवारी त्यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस त्यांनी आपल्या मित्रांसोबत वृद्धाश्रमात साजरा केला.या वृद्धाश्रमाला लागणारे जीवनावश्यक वस्तू त्यांनी दिल्या.यावेळी आनंद शिंदे,बाबु बिले,पप्पू डांगे, सिद्धेश रावराणे, सुनील रावराणे आदी उपस्थित होते.