महाविकास आघाडीचं महावितरणविरोधात ढोल बजाव आंदोलन !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 11, 2023 12:00 PM
views 256  views

 कुडाळ : कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव काळात विजेचा खेळ खंडोबा केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आलं आहे, यावेळी राष्ट्रवादी शरद पवारगट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी शरद पवारगट तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, काँग्रेसचे  अभय शिरसाठ, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, आनंद खटावकर, साबा पाटकर, नझिर भाई शेख, तब्रेज शेख, विजय प्रभू, आदी उपस्थित आहेत