देवगडात महावाचन उत्सव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 09, 2024 13:09 PM
views 61  views

देवगड : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ' महावाचन उत्सव ' सन २०२४ तालुकास्तर ग्रंथप्रदर्शन शेठ .म. ग . हायस्कुल देवगड येथे संपन्न झाला. शिक्षण विभाग तथा गट संसाधन केंद्र पं .स. देवगड आयोजित महावाचन उत्सव निमित्ताने जेष्ठ कवियेत्री  अनुराधा  दिक्षित , मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत व एन , एस पंत वालावलचे ग्रंथपाल शेवाळे  तर एन .एस पंत वालावलचे उपप्राचार्य शेटये , शेठ म .ग . हायस्कुलचे मुख्याध्यापक घोलराखे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते . 

कार्यक्रमाच्या सुरवातीला मि.स. पवार , देवगड नं१ , जामसंडे नं१ या प्रशालेच्या  विदयार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेषभुषा परीधान करून ग्रथदिंडीमध्ये सहभाग घेतला . या दिडींमध्ये  विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते . यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर व शास्त्रज्ञ डॉ . रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . त्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला  यावेळी वाचाल तर वाचाल आजच्या धकाधकीच्या  जीवनात आपल्याला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही परंतु भविष्यकाळात वाचना शिवाय पर्याय नाही .विदयार्थी  मोबाईल , टिव्ही यांच्यात  इतका आहारी गेला आहे कि, त्यामुळे त्याला वाचनाचा विसर पडला आहे . वाचनाचे महत्व पटवुन देताना जेष्ठ कवियेत्री  अनुराधा  दिक्षित  आजकाल वाढदिवसाला इतर वस्तु भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट म्हणून दयावे असे आवाहन त्यांनी केले .मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत यांनी आपल्या हसत खेळत शैलीने मुलांना वाचनाचे महत्त्व उदाहरणे देऊन सांगितले तर एन .एस पंत वालावलचे ग्रंथपाल शेवाळे म्हणाले कि हे विश्व फार मोठे आहे . विविध प्रकारचे अनुभव या  पुस्तकाच्या माध्यमातुन देता येईल असे ते म्हणाले .एन.एस पंत वालावलचे उपप्राचार्य शेटये यांनी वाचन हे ज्ञानाचे भांडार आहे . साहित्यातुन आपल्याला प्रेरणा मिळते.

 ग्रंथप्रदर्शनाला उमा बर्वे लायब्ररी, एन .एस पंत वालावल, जामसंडे हायस्कुल, शेठ म .ग. हायस्कुल मधीत ग्रथालयातील विविध साहित्यांचा सामावेश होता . या कार्यक्रमांसाठी विविध शाळांमधुन विद्यार्थी , शिक्षक व मोठया संख्येने ग्रंथप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सायली मोंडकर.  तर आभार अनुराधा कदम यांनी मानले .