कोकणसादच्या महावाचन महोत्सवातील विजेत्या वृषाली कुळयेचा सन्मान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 22, 2024 14:38 PM
views 129  views

देवगड : देवगड तालुक्यातील वाचन महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना दैनिक कोकणसाद यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महावाचन महोत्सव या स्पर्धेमध्ये तळेबाजार हायस्कूलची विद्यार्थिनी वृषाली धनंजय कुळये हिला बक्षीस मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष संदिप तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेकर, सचिव कृष्णा साटम सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक संघ यांच्याकडून अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

व शिक्षकांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.वाचनसंस्‍कृती वृद्धींगत करण्‍यासाठी  सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात महाराष्‍ट्र शासनाच्‍या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा वतीने ‘महावाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वैचारिक उंची आणि ज्ञानाची कक्षा उंचविताना अनेक संस्‍कारांपैकी एक म्‍हणजे ‘वाचनसंस्‍कार’ ही वाचनसंस्‍कृती वृद्धींगत करण्‍यासाठी  सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात महाराष्‍ट्र शासनाच्‍या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा वतीने ‘महावाचन महोत्सवाचे २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. देवगड या ठिकाणी वाचन महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

वाचन महोत्सव या उपक्रमांतर्गत वृषाली कुळये महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार. या विद्यार्थिनीला शिक्षकांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.