
मुंबई : कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते. यावर्षी घेण्यात आलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील विभागातून २५ विद्यार्थ्यांच्या ३० कलाकृतींची निवड झाली आहे.
या निवडलेल्या कलाकृतीनमधून शिल्पकला विभागातून कु. विशाल गोवळकर याला राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आहे तर कु. विशाल मसणे याना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. अभिमानाची गोष्ट आहे.निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे खालीलप्रमाणे मूलभत अभ्यासक्रम - मिथिल अंगचेकर, विराज पाचाडकर, ज्योती पांचाळ,साहिल परुळेकर,आदित्य सावरटकर, अभिषेक जावळे. कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष - तन्वी गोरीवले, धनंजय नलावडे,ऋतिक इनामदार,सोनल घाणेकर.
कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष - प्रतिक गांजेकर,स्वरूप पवार
रेखा व रंगकाला विभाग - तुळशी भुवड,सुजल निवाते,शुभम घोरपडे.
शिल्प व प्रतिमानबंध कला - प्रथमेश गोंधळी,सार्थक आदवडे, भूषण थवी,चैतन्य मांडवकर,रुचित सांगळे, विशाल गोवळकर, ऋषिकेश पड्याळ,सोहम धामणस्कर,अध्वज चव्हाण,विशाल मसणे या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत.
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर - चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.