महानाट्य अयोध्या ; 15 जानेवारीला वेंगुर्लेत !

कलाकारांची तगडी फौज कुडाळमधील !
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 13, 2024 12:50 PM
views 296  views

कुडाळ : संगीत, नृत्य आणि नाट्याची मेजवानी असणारे अयोध्येचा प्रवास उलगडणाऱ्या अयोध्या या महानाट्यचा 15 जानेवारीला वेंगुर्ले येथे शुभारंभ होत आहे. गीतकार गुरू ठाकूर, संगीतकार विजय गवंडे यांचाही सहभाग असून विशेष म्हणजे सर्व कलाकार कुडाळचे आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत महानाट्याचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई, निर्माता प्रणय तेली यांनी दिली.


    प्रणय तेली आणि केदार देसाई यांनी शनिवारी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले सागर एन्टरटेनमेंटच्या माध्यमांतून नवीन कलाकृती निर्माण करावी येथील कलावंतांना त्यामध्ये संधी मिळेल हा दूरदृष्टीकोन ठेवून सिंधु संकल्प अकादमी, मार्फत हा आमचा प्रयत्न आहे जिल्हातील अनेक कलाकृतीबाबत बरेच दिवस  चर्चा सुरू होती योगायोगाने चर्चा सुरू असतानाच आता राम मंदिर उभं राहतय, त्यानिमित्ताने अयोध्या वर काही तरी करण्याचे ठरले ,अयोध्येबद्दल माहिती कलेक्शन सुरू झाली.या संदर्भात आम्हाला अधिक माहिती नव्हती, लोकांना ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी लोकांपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.या महानाट्यातील सर्व टीम सिंधुदुर्ग मधील खास करून कुडाळ मधील आहे.गीतकार गुरू ठाकुर तर संगीतकार विजय गवंडे आहेत. सिंधुदुर्ग मधील लोकांनी मिळून हे मोठं शिवधनुष्य उचलले आहे.आम्ही हा संकल्प घेऊन प्रथम पालकमंत्री  रविंद्र चव्हाण यांना भेटलो, त्यांचे  याबाबत फार मोठे सहकार्य लाभले आहे या महानाट्याचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते मधुसूदन कालेलकर सभागृह, वेंगुर्ला येथे 15 जानेवारीला सायंकाळी चार वाजता होणार आहे.हा प्रयोग महाराष्ट्रात व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल अयोध्या" नाटकात २५ कलाकारांचा सहभाग आहे. साईकलामंच, संकल्प क्रिएशन,बाबा वर्दम थिएटर अशा सर्वच संस्थांचे  कलाकार आहेत.


या नाटकात गाणी केदार देसाई यांनी लिहीली आहेत. ग.दि.मांडकुळकर,सुधीर फडके यांच्या कलाकृतीला साजेशी अशी गाणी या नाटकात घेण्यात आली आहेत. संगीत विजय गवंडे, अजित चव्हाण, मितेश चिंदरकर यांचे आहे व्हिडिओ ग्राफिग इशांत देसाई यांचे आहे निर्मिती प्रणय तेली, दिग्दर्शक केदार देसाई, मॅप इव्हेंट अभिजित परब, मयुर शिरसाट यांचे आहे. या महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे