
सावंतवाडी : जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र व आपले सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार अरूण उंडे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
दरम्यान याबाबत योग्य ती चौकशी केली जाणार असून सामान्य जनतेला योग्य न्याय दिला जाईल, असे तहसीलदार अरूण उंडे यांनी सांगितले.