दोडामार्गच्या सुसज्ज नगरपंचायत इमारतीचे शानदार भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री चव्हाण, मंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: August 24, 2023 18:50 PM
views 166  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतसाठी 3 कोटी इतक्या निधीतून मंजूर असलेल्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच भूमिपूजन गुरवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विशेष उपस्थीतीत शानदारपणे पार पडले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं. 


  या सोहळ्यास  जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांसह बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव, नगरसेविका संजना म्हावळनकर, सुकन्या पनवेलकर, क्रांती जाधव, मयेकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, चंदन गावकर, संतोष नानचे, राजेश प्रसादि, सोनल म्हावळनकर यांसह  एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर, राजू निंबाळकर, सुधीर दळवी, गणेशप्रसाद गवस आदींची उपस्थिती होती.