
वेंगुर्ला : तालुक्यातील उभादांडा - नवाबाग ग्रामस्थांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव २०२५ दिनांक १ व २ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. सलग ८ व्या वर्षी बायुला घुमटेश्वर मंदिर येथे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्री गजाननाचे जल्लोषात आगमन मिरवणूक सोहळा सिंधुरत्न ढोल ताशा पथक यांच्या ढोल ताश्यांच्या गजरात होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता शी गणपती पूजन, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री देवी सातेरी महिला वारकरी भजन मंडळ, अणसूर यांचे भजन, ५ वाजता श्री देव रामेश्वर महिला वारकरी भजन मंडळ यांचे भजन व सायंकाळी ७ वाजता नवाबाग ग्रामस्थांची संगीत आरती होणार आहे.
रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री गणपती पूजन व आरती, १० वाजता नवाबाग ग्रामस्थ वारकरी भजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता स्थानिक महिलांची फुगडी व हळदी कुंकू समारंभ व सायंकाळी ६ वाजता विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नवाबाग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.