
दोडामार्ग : पिकुळे लाडाचे टेंब येथील रत्नाकर निवास इथं शनिवारी १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ९:३० वाजता श्री गणेश मूर्तीस अभिषेक, ११ वा. गणेश पुराण वाचन, दुपारी १२:३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, रात्री ८ वा. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन व ११ वा. सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या उत्सवात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमित गवस , शत्रु गवस, रत्नदीप गवस यांनी केले आहे.