
वैभववाडी : नवसाला पावणारा व हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या करुळ भोयडेवाडी येथील गजराजेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. यानिमित्त गजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी महिला भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मंदिरात सकाळी अभिषेक, पुजा, आरती, पालखी प्रदक्षिणा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर युवा मित्र मंडळ करुळ भोयडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व भाविकांना तिर्थप्रसाद व महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली होती. या निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू तसेच अन्य कार्यक्रमाची रेलचेल मंदिरात सुरू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रतिष्ठीत मान्यवर, शासकीय अधिकारी यांचे मंडळांकडून स्वागत करण्यात येत आहे.