
सावंतवाडी : न्यू इंग्लिश स्कूल मडूरा या विद्यालयाचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के येवढा लागला असून परीक्षेस प्रविष्ट ४९ पैकी ४९ ही विद्यार्थी पास होत शाळेच्या उज्वल यशाची निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात मानस समीर कोलते याने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर ऋतुजा ज्ञानदेव नाईक हिने ९५.६० टक्के गुणांसह व्दितीय तर विनीत रविंद्र पंडित ९४.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी भिनंदन करत शुभेच्छा दिल्या.