
सावंतवाडी: माडखोल गावात मतदार माडखोल विकास पॅनलच्या बाजून असून सरपंच पदाच्या उमेदवार स्वप्नाली राऊळ यांच्यासह पॅंनलचे सर्व उमेदवारांना निवडून देत नव्या चेहऱ्यांना ग्रामस्थ संधी देतील, असा विश्वास पॅनलचे सुबोध राऊळ यांनी व्यक्त केला. सकाळपासूनच मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पहाता यंदा परिवर्तन घडणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माडखोल विकास पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.