पत्रकारांसाठी माधवबागच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 19:04 PM
views 40  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रविवारी २२ ऑक्टोबरला या शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड असे आजार असलेल्या रुग्णांची तपासणी होणार आहे. तसेच तपासणी अंतर्गत इसीजी, ब्लड शुगर, टीएमटी, ब्लड प्रेशर चेकअप आदी तपासण्या गरजेनुसार करण्यात येतील. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर रविवारी २२ ऑक्टोबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथील माधवबागच्या शाखेत होणार आहे.  या शिबिराचा जास्तीत-जास्त गरजूंनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी हरिश्चंद्र पवार ९४०३०७३४४४, रामचंद्र कुडाळकर ९७६३७१७७६१, माधवबाग-सावंतवाडी  ७७७४०२८१८५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.