लोरे नं. २ येथे विद्यार्थांचा सत्कार - शालेय साहित्याचे वाटप

सामाजिक कार्यकर्ते अभय पेडणेकर, विनोद पेडणेकर यांनी राबविला उपक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2024 14:22 PM
views 50  views

वैभववाडी : मेहनतीने मिळवले यश अधिक आनंद देणारं असतं.विद्यार्थ्यानी शालेय जीवनात अभ्यास करून उज्वल यश संपादन केले पाहिजे.यातून गावचा नावलौकिक वाढलं जाईल असं मत लोरे नं२ गावचे सरपंच विलास नावळे यांनी व्यक्त केले.

लोरे नं२ येथील प्रगतिशील शेतकरी अभय पेडणेकर व ग्रामपंचायत सदस्य विनोद पेडणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपसरपंच रुपेश पाचकुडे, माजी सरपंच महेंद्र रावराणे,अभय पेडणेकर,  विनोद पेडणेकर,माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकुडे, राजेश डोंगरे, मुख्याध्यापक संजय रासम, श्री.डावरे, श्री.कदम,दिपक रावराणे, भालचंद्र रावराणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नावळे म्हणाले, अजूनही समाजात दातृत्वान माणसं आहेत.त्यांच्या या दातृत्वाची प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे.आपल्या गावातील पेडणेकर बंधूंनी राबविला उपक्रम स्तुत्य आहे.विद्यार्थानी अशा संधीचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी व्हावे.भविष्यात चांगले यश संपादन करून गावचे नाव रोशन करावं असं आवाहन श्री नावळे यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी महेंद्र रावराणे, गुरुराज डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माध्यमिक विद्यालयाचा १००टक्के निकाल लागल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचं अभिनंदन करण्यात आले.त्याचबरोबर कै.दिपक पाचकुडे व कै.धोंडू मांजलकर यांच्या स्मरणार्थ दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.