लोरे येथे दुग्ध सेवा संकलन केंद्राचा शुभारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 12, 2023 10:53 AM
views 83  views

कणकवली : रविवार ११ जून रोजी लोरे वि.का.स. सेवा सोसायटी अंतर्गत श्री देव गांगोचाळा दुग्ध सेवा संकलन केंद्राचा शुभारंभ सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडला. दुग्ध सेवा संकलन केंद्र मध्ये विविध अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.दुधाचा साठा, दुधाची दरवाढ यासंबधी सर्व माहिती शेतकऱ्यांना प्रत्येक दिवशी दिली जाणार आहे. पारदर्शक कारभारातून दुग्ध सेवा संकलन केंद्र चालवले जाणार आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळशीदास रावराणे साहेब यांनी कार्यक्रमा प्रसंगी सर्व शेतकऱ्याने केले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच अजय रावराणे उपसरपंच सुमन गुरव, सोसायटी सचिव रमेश चव्हाण, सोसायटी सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.