
सावंतवाडी : नाट्य आणि सिने अभिनेता दिग्दर्शक बाळ पुराणिक यांच्या संकल्पनेतून 'ध्यान लागले रामाचे' या कार्यक्रमाचे क्षितिज इव्हेंट सावंतवाडी या संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या निमित्ताने सोमवार २२ जाने २०२४ रोजी सायं ठीक ६ वाजता सावंतवाडी येथे केशवसुत कट्ट्यावर क्षितिज इव्हेंट सावंतवाडी या संस्थेच्यावतीने श्री परमेश्वर निर्मित "ध्यान लागले रामाचे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना नाट्य सिने अभिनेता - दिग्दर्शक श्री बाळ पुराणिक यांची असुन या कार्यक्रमात स्वप्नील गोरे आणि राधा जोशी हे गायक कलाकार तर पप्पू नाईक (हार्मोनियम), सिद्धेश कुंटे ( तबला ), संकेत म्हापणकर (पखवाज) हे कलाकार साथसंगत करणार असून कार्यक्रमाचे निवेदन गौरवी घाटे करणार आहे. या कार्यक्रमात श्रीराम, सीता , लक्ष्मण,आणि हनुमान यांचा देखावा करण्यात येणार असून यातील भुमिका बालकलाकार साकारणार आहेत. यावेळी प्रभू श्रीरामांचे स्वागत, श्रीराम पूजन आणि आरती करण्यात येणार आहे. तरी तमाम रामभक्तांनी आणि रसिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.