वेंगुर्ल्यातील मोठ्या कॅनिंग व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूट : प्रफुल्लचंद्र परब

Edited by: दिपेश परब
Published on: May 25, 2024 14:18 PM
views 810  views

वेंगुर्ला :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे हापूस आंबा कॅनिंगचा दर ४४ ते ४५ रु असताना वेंगुर्ला तालुक्यातील काही मोठे कॅनिंग व व्यापारी ३३ रु दराने आंबा खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एका टनामागे सुमारे ११ हजारांच्या आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कॅनिंग व्यापाऱ्यांनी ही शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी अन्यथा वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल असा इशारा वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती तथा मातोंड येथील आंबा बागायतदार  प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याचे नुकसान झाले असून आंब्याच्या कलमांचे सुद्धा नुकसान झाले आणि त्यातच जर अशाप्रकारे कमी दर मिळत आहे.  देवगड येथे जास्त दर असताना वेंगुर्ला येथे किलोमागे तब्बल ११ रुपयांचा फरक ठेऊन कमी दराने आंबा खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यामुळे वेळीच या मोठ्या व्यापाऱ्यांनी योग्य दर द्यावा अन्यथा वेगळ्या पद्धतीने याचा जाब विचारला जाईल असा इशारा मातोंड येथील आंबा बागायतदार शेतकरी तथा वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांनी दिला आहे.