जीवनाकडे सकारात्मकतेने पहा : उदय परब

Edited by:
Published on: December 23, 2024 15:04 PM
views 253  views

मालवण : हडी जेष्ठ नागरिक संघांचे विविध उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत. संघाच्या उत्कर्षासाठी चंद्रकांत पाटकर आणि त्यांचे सहकारी मोठे योगदान देत आहेत. संघाने आपली वाटचाल अशीच दैदीप्यमान ठेवावी. जेष्ठानी आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. जीवनाकडे पाहण्याचा दृष्ठिकोन सकारात्मक ठेवा असे प्रतिपादन माजी सभापती उदय परब यांनी हडी येथे केले.

फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आचरा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अशोक कांबळी, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, माजी सरपंच  विलास हडकर, संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष आरती कदम, कार्यवाह सुभाष वेंगुर्लेकर, भालचंद्र सुतार, प्रभाकर सुतार, प्रभाकर तोंडवळकर, संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर, हभप हृदयनाथ गावडे, उमेश हडकर, पोलीस पाटील दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर, तृप्ती हडकर, जान्हवी पांजरी, मयूर करंगुटकर, सौ स्नेहा परब आदी उपस्थित होते. 

सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले, जेष्ठानी मनःशांतीला महत्व दिले पाहिजे. या संघांचे कार्य खूप मोठे आहे. संघाला जिथे आवश्यकता असेल तिथे निश्चितपणे मी मदतीस तयार असेन.

अशोक कांबळी म्हणाले, जेष्ठ ग्रामस्थांना व्यायामाची अतिशय गरज आहे. वय वाढल्यानंतर अनेक आजार आपोआप येतात. जीवनातील बदल स्वीकारा. आजाराना आनंदाने सामोरे जावा. ध्यानधारणा आणि योगाचे महत्व ओळखा. यावेळी विलास हडकर, श्री सुरेश भोजने यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून पन्नास वर्षे वैवाहिक जीवनाला पूर्ण झालेले सभासद सौ भारती रवींद्र आळवे तसेच 75 वर्षे पूर्ण झालेल्या अठरा सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला. हडी गावातील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा सुद्धा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ह भ प हृदयनाथ गावडे यांचे प्रबोधनात्मक किर्तन सादर झाले. कै. गणेश बाळकृष्ण परब यांच्या स्मरणार्थ 50 प्लास्टिक खुर्च्या यावेळी सौ स्नेहा मंगेश परब यांनी संघास भेट दिल्या. 

यावेळी ज्येष्ठ नागरिक नागरिक संघाचे महादेव सुर्वे, रमेश कावले, प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, जानू कदम, अनंत घाडी, वनिता हडकर, सीमा शेट्टी, प्रज्ञा तोंडवळकर, प्रभाकर कांदळगावकर, राधाबाई कांबळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी तर आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.