लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संतोष तळवणेकर यांना जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 20, 2024 14:21 PM
views 195  views

सावंतवाडी : अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवाजी तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.

संतोष तळवणेकर हे गेली 20 वर्षे सावंतवाडी तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. कोरोना कालावधीत त्यांनी समाजहित व विद्यार्थीहित जोपासत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले व कौतुकास्पद कामगिरी बजावली. गेली अनेक वर्षे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या कार्यकलावधित त्यांनी अनेक सुधारणा व नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.तसेच  ते राजे प्रतिष्ठान कामगार सेना  सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी काम करत आहेत.या माध्यमातून विद्यार्थी हिताचे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवत आहेत.या यशाबद्दल संतोष तळवणेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जूनला कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.