२०२४ साठी स्थानिक सुट्या जाहिर...!

Edited by:
Published on: May 17, 2024 13:49 PM
views 439  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील महसूली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन सन 2024 या वर्षाकरीता दिनांक 09 ऑगस्ट 2024 नागपंचमी, दिनांक 06 सप्टेंबर 2024 हरितालिका व दिनांक 31 ऑक्टोबर 2024 नरक चतुर्दशी (दिवाळी) याप्रमाणे स्थानिक सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत.