कर्ज मंजूर पण अर्जदाराची सहीच नाही | कुठे घडला हा प्रकार

Edited by: भरत केसरकर
Published on: October 22, 2023 18:02 PM
views 544  views

कुडाळ : सर्वोदय सहकारी पतसंस्थेची निवडणूक तापणार याची चिन्हे रंगू लागली आहे.याचं कारण या पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांनी कोणतेही कागदपत्र नसताना दहा लाखाचे कर्ज उचलल्याची माहिती ही माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. त्यामुळे विद्यमान पॅनलच्या विरोधात विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. तब्बल 38 वर्षानंतर या पतसंस्थेची निवडणूक होत आहे होत आहे  या संपूर्ण प्रकरणामुळे कै.शिवरामभाऊ जाधव  यांनी रुजवलेले माणगाव  खोऱ्यातून सर्वोदय पतसंस्थेच्या माध्यमातून उभे केलेले सहकाराचे रोपटेच काही लोक लुटत असून हे जणू धोक्यात आल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातूनच पाहायला मिळत आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की सर्वोदय पतसंस्थेकडून विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी स्वताच्या नावावर दहा लाख कर्ज घेतले.यासाठी वीस लाखाचा बोजा उतरण्यात आला आहे.मात्र या कर्ज प्रकरणाला "जामिन" नसून कर्जदाराची पण "सही" त्या कर्ज फार्मवर नाही आहे.या घटनेने कुडाळ तालुक्यासह माणगाव खोऱ्यात एकच खळबळ माजली आहे.माहितीच्या अधिकारात ही माहीती उजेडात आली आहे.विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये २० लाख,माणगावचे माजी माजी सरपंच तथा विद्यमान संचालक जोसेफ डाॅन्टस २२ लाख तर एका विद्यमान संचालक उत्तम जनार्दन सराफदार १७ लाख अशा ह्या तिघानी कर्जाची उचल केलेली  आहे.

तर सदर तीन व्यक्तीवर ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी या तक्रारदाराने अप्पर आयुक्त आणी विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण भवन नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ओरोस,सहाय्यक सहकारी संस्था कुडाळ यांच्याकडे केली आहे.तसेच या संस्थेच्या अध्यक्षासह काही संचालकांना निवडणूक लढवण्यासाठी एक टर्म ची बंदी घालावी व फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी तक्रारदार व माहीती अधिकारात माहीती घेतलेले दिलीप रघुनाथ माळकर यांनी केली आहे. माहितीच्या अधिकारात अनेक गोष्टी सर्वोदय पतसंस्थेच्या बेनामी कर्ज प्रकरणाच्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक असलेले व या सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष असलेले प्रकाश मोर्ये हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

यावर विरोधी पॅनलचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी वित्त बांधकाम सभापती सगुण धुरी आपली भूमिका काय घेतात? आणि काय भूमिका मांडतात? यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. त्यामुळे विद्यमान पॅनल विरुद्ध विरोधी पॅनल  अशी ही निवडणूक रंगतदार होणार असून जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश  मोर्ये यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.

या पतसंस्थेची निवडणूक होत असून प्रकाश मोर्ये यांच्या राजकीय वर्चस्वाला एक प्रकारचा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष असलेले व सध्याच्या निवडणुकीतील उमेदवार असलेले प्रकाश जगन्नाथ मोर्ये,जोसेफ पीटर डाॅन्टस आणी उत्तम जनार्दन सराफदार या तीन संचालकावर कारवाईची मागणी दिलीप रघुनाथ माळकर यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे.या घटनेने एकच खळबळ माणगाव खोऱ्यात माजली आहे.