
वैभववाडी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना केंद्राचा उद्या दि.२७ जुलै लोकार्पण सोहळा आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण वैभववाडीत दाखवले जाणार आहे.तालुका खरेदी विक्री संघाने येथील पंचायत समिती सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सकाळी १०. ते ११.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.