
कणकवली : वागदे गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्या मालकीची एस. स्क्रॉस गाडी नंबर – (MH07 AG 3669) या खाजगी गाडीतून सुमारे २ लाख रु किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना सोमवारी रात्री 11वासता बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांकडून पकडण्यात आली असल्याचा आरोप युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर यांनी केला आहे. स्वतः संदीप सावंत हे गाडी चालवीत होते. त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. मात्र आमदार नितेश राणे पोलिसांवर दबाव टाकून या गुन्ह्यातून संदीप सावंत यांना वगळून दुसऱ्याच एका व्यक्तीला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप युवासेनेचे तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात गोवा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. मात्र आ. नितेश राणेंच्या दबावामुळे आणि भाजप पदाधिकारी म्हणून जर संदीप सावंत यांची या गुन्ह्यातून सुटका केली जाणार असेल तर शिवसेना , युवासेना शांत बसणार नाही. संदीप सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार आहे. असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर यांनी दिला आहे