
सावंतवाडी : सावंतवाडी लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. उमा उमेश चोडणकर यांच्या निधनाबद्दल त्यांना लायन्स क्लब आणि लायनेस परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अगदी अल्पशा आजाराने सौ उमा चोडणकर यांचे नुकतेच निधन झाले.
लायन्स परिवारातर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ लायन राजन पोकळे यांनी उमा वहिनींचे अकल्पित जाणे हा सर्वांना प्रचंड धक्का आहे असे सांगून उमा चोडणकर यांनी गेल्या 30 वर्षात समाजात चांगले काम केले त्यांच्या जाण्याने आपले व्यक्तिशः कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे असे सांगितले. अनिता पाटील यांनी उमा ही बहिण, मैत्रीण, सखी अशा विविध रूपात आमच्या पाठीशी राहिली असे सांगताना त्यांना भावना आवरता आले नाहीत. अँड अभिजीत पणदुरकर यांनी उमा मामी, आईचे दुसरे रूप होते. ती एक चांगली गृहलक्ष्मी होती असे सांगून दुःख व्यक्त केले. रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी उमा वहिनींच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करताना जीवन हे क्षणभंगुर आहे याची प्रचिती लायन्स क्लबला तिसऱ्यांदा आली आहे. यापूर्वी लायन अशोक देसाई, लायन राजेंद्र आंगणे यांचे अकल्पित निधन झाले हा तिसरा धक्का आहे ,लायन्स परिवारातील सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ला.प्रवीणा पेंढारकर यांनी दुःख व्यक्त करताना प्रत्येक महिला भगिनींनी आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आजारपणाकडे किरकोळ बाब म्हणून पाहतो ते योग्य नसून लायन्स क्लबने आपल्या परिवारातील सर्वांसाठी विशेष आरोग्य शिबीरे घ्यावी अशी सूचना केली. ला नंदा पोकळे यांनी उमा चे जाणे हा सहन करण्या पलीकडील धक्का होता. एक साधी गृहिणी असलेल्या उमाला लाईनीझममध्ये आपण आणले आणि नंतर तिने स्वतःच्या कार्याने आणि स्वभावाने अनेक मंडळात काम करून मोठी भरारी घेतली होती.
अध्यक्ष अमय पै यांनी उमा वहिनींचे अकल्पित जाणे हे केवळ आपलेच नाही तर समाजाचे मोठे नुकसान आहे असे सांगितले ला. श्वेता शिरोडकर, सुजाता परब, सुनीता टक्केकर, सौ. म्हापसेकर, अंजली नाईक,. अमिता मसुरकर, ज्येष्ठ लायन रवि स्वार, महेश पाटील, रविकांत सावंत, सुनील दळवी, रितेश हावळ या सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.