मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा | भाजपा नेते निलेश राणे यांची कुडाळ - मालवण तहसीलदारांना सूचना

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 28, 2023 16:16 PM
views 94  views

मालवण : भाजपाचे कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी आज कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झालटे यांना पत्र देत कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व मतदारांची मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे. अश्या परिस्थितीत आपल्या कुडाळ व मालवण तालुक्यातही ही प्रक्रिया राबविण्यात यावी यासाठी निलेश राणे यांनी कुडाळ व मालवण तहसीलदार यांना त्या तशा सूचना दिल्या आहेत.