सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार अनिल सौदागर तर महिला उद्योजक पुरस्कार मंदाकिनी सामंत यांना जाहिर

उद्या होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात होणार वितरण
Edited by: दिपेश परब
Published on: January 30, 2023 17:04 PM
views 162  views

वेंगुर्ले: 

 सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या मंगळावार दि. ३१ जानेवारी रोजी वेगुर्लेत होणाऱ्या "व्यापारी एकता मेळाव्याच्या" निमीत्ताने देण्यात येणारे उत्कृष्ठ व्यापारी व जिल्ह्याच्या व्यापारी संघटनेत उत्कृष्ठपणे योगदान देत संघटना मजबुत करण्यास सदैव तत्पर कार्यरत असलेले अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जिवन गौरव पुरस्कार तर महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल अशा पध्दतीने काम करणाऱ्या महिलांसाठी देण्यात येणारा श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्कार भटवाडी येथील नर्मदा कँश्यू फँक्टरीच्या संचालिका सौ. मंदाकिनी दिलीप सामंत यांना जाहिर करण्यांत आल्याची माहिती वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत जाहिर केले. या मान्यवरांना व्यापारी एकता मेळाव्यात मान्यवराच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

    येथील वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेवेळी उपस्थित मान्यवरांत संघाचे कार्यवाह राजन गावडे, व्यापारी राजेश शिरसाट, सुनिल डुबळे, नितीन सावंत, श्रीनिवास सौदागर, प्रभाकर आजगांवकर, कपिल पोकळे, पंकज शिरसाट, गणेश नार्वेकर, गणेश अंधारी, अश्विन पांगम आदींचा समावेश होता.

  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार हा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे बरीच वर्षे अध्यक्षपद भुषविलेले व गेली ३० वर्षे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारीणीवर काम करीत असलेले, त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था संस्थापक असलेले व १२ वर्षे अध्यक्षपद भुषविणारे, सिंधुदुर्ग जिल्हा कंन्झुमर डिस्ट्रीक असोसिएशनचे संस्थापक व माजी अध्यक्षपद अशी पदे भुषविलेले, गेली १९७२ पासून सुमारे ५० वर्षे व्यापार व्यवसायात कार्यरत असलेले आणि नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेची धुरा सामाजिक काम म्हणून सांभाळणारे अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जाहिर करण्यात आला. तर वेंगुर्ले भटवाडी येथील नर्मदा कँश्यू फँक्टरीच्या माध्यमातून सन १९८३ पासून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या तसेच सुमारे ५० ते ६० कुटुंबांना जोडणाचे काम केलेल्या आणि महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचा महिला उद्योजक पुरस्कार पटकाविलेल्या सौ. मंदाकिनी दिलीप सामंत यांची श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी दिली.

या दोन्ही पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय वेंगुर्ले भटवाडी येथे होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याच्या कार्यक्रमात वितरण करण्यात येणार आहेत.